Monday, March 30, 2020

चांगले निर्णय कसे घ्यावे ?


कंपनींच्या विलीनीकरणाचा एक अभ्यास असे दर्शवतो, की ८३% निर्णय हे शेयर धारकांसाठी कोणताही फायदा निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत.

निर्णय घेताना बहुतेक वेळा Guts (हिंमतीचे) अनुसरण केले जाते. पण Guts ने घेतलेला तुमचा निर्णय किती वेळा चुकला आहे ?

२००९ साली फक्त अमेरिकेतच ६२ हजार टॅटू मिटवले गेले. एका ब्रिटिश सर्वेमध्ये असे आढळून आले की ८८% लोकांचा नवीन वर्षाचा निश्चय तुटला होता.

Brett Favre या खेळाडूने खेळामधून संन्यास घेतला होता, मग तो परत खेळायला आला, मग परत संन्यास घेतला. हे पुस्तक लिहिताना तो खेळत होता, निवृत झाला होता.

“जर आपण आपल्या Guts वर विश्वास ठेवू शकत नाही, मग कशावर ठेवू शकतो ?”

तुमच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे का ?

स्वतःच्या कमतरतांची जाणीव असणे, हे त्या सोडवण्यासाठी पुरेसे नाही. तुम्हाला दूरचे दिसत नाही, याची जाणीव असल्यामुळे तुम्हाला चांगले दिसायला लागते का ? समस्या माहिती असणे पुरेसे नाही.

आपल्यापैकी क्वचितच काही लोक, मोठे निर्णय घेताना प्रक्रियेचा वापर करतात. निर्णय घेण्याची एकच पद्धत प्रचलित आहे. ती म्हणजे Pros & Cons list (नफा व नुकसान यादी) तयार करणे. आपण एका बाजूला होणारे फायदे लिहितो, तर एका बाजूला होणारे नुकसान. मग आपण पाहतो की मला हा फायदा होत आहे, तर हे नुकसान. जर फायदा आणि नुकसान समान असेल तर आपण दोन्ही मुद्द्यांवर काट मारतो. म्हणजेच आपण कोणत्याही निर्णयापासून होणारे फायदे आणि नुकसान यांची तुलना करतो आणि त्यावर निर्णय घेतो.

पण या पद्धतीमध्ये एक दोष आहे. कोणता मुद्दा किती महत्वाचा आहे ? हे ठरवतांना आपण निष्पक्ष नसतो. आपल्या मनात आधीच काही गृहीतके असतात. म्हणून या पद्धतीपेक्षा प्रगत काहीतरी पद्धत आपल्याला निर्णय घेण्यासाठी हवी.

निर्णय घेण्याचे चार शत्रू आहेत.

१. हे किंवा ते ?

आपल्या जीवनात बहुतांश निर्णय हे किंवा ते असतात. “मी हे करू की ते”, ह्यापेक्षा असा प्रश्न विचारा, “असा कोणता मार्ग आहे ज्याने मी दोन्ही गोष्टी करू शकेल ?” आश्चर्यकारक रीत्या बऱ्याच वेळा दोन्ही गोष्टी करणे शक्य असते.

निर्णय घेण्याचा पहिला शत्रू आहे संकीर्ण विचार करणे. कमी पर्यायाचा विचार करणे. हे किंवा ते असा विचार करणे. मी ब्रेकअप करू की नाही ? हा विचार करण्यापेक्षा मी हे नातं कोणत्या प्रकारे चांगलं करू शकतो, हा विचार करणे.

“मी कार घेऊ की नाही ?” असा विचार करण्यापेक्षा “पैसे खर्च करण्याचा सर्वोत्तम उपाय कोणता ज्याने माझ्या कुटुंबाचे भले होईल ?” हा विचार करणे बरे.

२. पुर्वाग्रह पुष्टिकरण

जेव्हा लोकांकडे माहिती गोळा करण्याची संधी असते, तेव्हा ते बहुतेक वेळा तीच माहिती गोळा करतात जी त्यांच्या पूर्वग्रहांशी सहमत असते. जसे तुम्ही तेच न्यूज चॅनल पाहणार ज्यावर तुमच्या आवडत्या नेत्याची प्रशंसा केली जाते.

जे लोक सतत नवीन मोबाईल विकत घेत राहतात ते मोबाईल का बदलला पाहिजे याची माहिती पाहतील. पण मोबाईल का नाही बदलला पाहिजे ? ही माहिती पाहणार नाहीत.

पुर्वाग्रह पुष्टीकरण बद्दल सर्वात फसवी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे निर्णय विज्ञानवादी वाटतील. पण खरे तर तुम्ही दुसरी बाजू नाकारून टाकता कारण ती तुमच्या पुर्वग्रहांच्या विरुद्ध असते. आपण बऱ्याचदा असे भासवतो की आपण सत्य शोधत आहोत, पण खरे तर आपण फक्त आपले निर्णय बरोबर असल्याचे आश्वासन शोधत असतो.
जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट सत्य हवी असते, तेव्हा आपण फक्त त्याच गोष्टींवर लक्ष देतो ज्या आपल्या निर्णयाला दुजोरा देतात. ह्या गोष्टीवरून मग आपण निकष काढतो की माझा निर्णय बरोबर आहे, तर्कसंगत आहे.

आपल्या आवडत्या नेत्या बद्दल येणारे चांगले मेसेज आपण व्हाट्सअप वर फॉरवर्ड करतो वाईट मेसेज नाही, यालाच म्हणतात पूर्वाग्रह पुष्टीकरण.

३. अल्पकालीन भावना.

इंटेलची कथा

मेमरी – माहिती जपून ठेवण्याची जागा.

मायक्रोप्रोसेसर – माहितीवर प्रक्रिया करणारे यंत्र.

इंटेलचे अध्यक्ष Andy Grove यांच्यासमोरील दुविधा आली होती. इंटेलचा व्यवसाय मेमरी वर आधारित होता आणि कंपनी जगात मेमरीचा एकमेव स्त्रोत होती. पण १९७० मध्ये दहा-बारा नवीन प्रतिस्पर्धी कंपन्या आल्या.
दरम्यानच्या काळात इंटेलच्या एका छोट्या संघाने मायक्रोप्रोसेसर विकसित केले. आता कंपनीमध्ये दोन उत्पादन होते.

१. मेमरी

२. मायक्रोप्रोसेसर

कंपनीचे मुख्य उत्पन्न मेमरी मधूनच येत होते. पण प्रतिस्पर्धी आल्यामुळे आता हा व्यवसाय कमी होत चालला होता.
आता इंटेल मध्ये काय करावे ही चर्चा सुरू झाली. मेमरी बनवण्यासाठी एक मोठी फॅक्टरी सुरू करावी ? की मायक्रोप्रोसेसर व्यवसायावर भर द्यावा ?
तेव्हा अध्यक्षांनी स्वतःला एक प्रश्न विचारला, जर कंपनीने मला काढून टाकले तर नवीन अध्यक्ष काय निर्णय घेईल ? तेव्हा त्यांना उत्तर भेटले की मेमरीचा व्यवसाय सोडून द्यावा. कारण नवीन व्यक्ती जो येईल त्याला मेमरी व्यवसायाशी काही भावनिक जोड नसेल तो व्यावहारिक निर्णय घेईल. मेमरी व्यवसायापेक्षा आता मायक्रोप्रोसेसर व्यवसायावर भर देणे योग्य राहील.

४. अतिआत्मविश्वास

“Nuclear प्लांट मध्ये बिघाड होण्याची शक्यता दहा हजार वर्षात एक आहे.”
-Vitali Skyarov
Minister of Power Ukraine. Chernobyl दुर्घटना होण्याच्या २ महिने आधी.

“अभिनेत्यांना बोलताना कोणाला पाहायचे आहे.”
– Harry Warner
Warner Bro.

“या इलेक्ट्रिक च्या खेळण्याचा काय उपयोग ?”
– William Ortan
– Telegraph Company (ग्राहम बेल चे फोनचे पेटंट नाकारताना)

निर्णय घेण्याचा चौथा शत्रू आहे अतिआत्मविश्वास. आपल्या भाकितावर आपला फार विश्वास असतो.

आता या चार शत्रूंवर उपाय काय ?

१. पर्याय वाढवा

आपल्यापैकी अनेकांना वाटते की निर्णय घेणे म्हणजे दोन पर्यायांपैकी एकाची निवड करणे. स्वतःला एक प्रश्न विचारा, जर सध्या अस्तित्वात असलेल्या पर्यायांपैकी कोणताच पर्याय तुम्ही नाही निवडला तर काय कराल ?

फक्त तीस टक्के संस्था एकापेक्षा अधिक पर्याय बद्दल विचार करतात. आपल्याला वाटतं त्यापेक्षा अधिक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात. आपल्याला वाटतं त्यापेक्षा अधिक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात. आणि फक्त सध्या समोर असलेल्या पर्यायांचा विचार करणे म्हणजे इतर पर्यायांकडे दुर्लक्ष करणे.

समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेण्यासाठी १००० रुपये जमा करत आहात. पण तुम्हाला एक चांगला २००० चा ड्रेस १००० मध्ये मिळत असेल तर तुम्ही काय कराल.

A. हा चांगला डिस्काउंट वाला ड्रेस विकत घेईल

B. हा चांगला ड्रेस विकत घेणार नाही.

वरील प्रश्न विचारला असता ७५% लोकांनी ड्रेस विकत घेण्याचा निर्णय घेतला.

पुढे शोधकर्त्यांनी दिलेल्या पर्यायांमध्ये थोडा बदल केला.

२००० चा ड्रेस तुम्हाला १००० मध्ये मिळत असेल तर तुम्ही काय कराल ?

A. हा चांगला डिस्काउंट वाला ड्रेस विकत घेईल

B. हा चांगला ड्रेस विकत घेणार नाही, तर १००० ची एखादी इतर वस्तू विकत घेईल.

आपण १००० रुपयांची एखादी इतर वस्तू खरेदी करू शकतो, याची आठवण करून देण्याची आपल्याला खरोखर गरज आहे का ? तर हो ही आठवण करून देताच ड्रेस घेणाऱ्यांचे प्रमाण ७५% वरून ५५% झाले होते. तुम्ही इतर अधिक पर्यायांचा विचार करणारच नाही जर तुम्ही त्यांना दुर्लक्षित करत असाल, तुमच्या लक्ष्यात येणारच नाही की तुमचे पर्याय संकीर्ण आहेत.

अशा व्यक्तीला शोधा ज्याने तुमची समस्या याआधी सोडवली आहे.

२. तुमची गृहीतके सत्य आहेत का कसे तपासावे ?

१. आपल्याशी असहमत होणे इतर लोकांना सोपे जाईल, असे आपण वागू शकतो.

२. आपण असे वेगळे प्रश्न विचारू शकतो ज्याने आपल्याला वेगळी माहिती भेटेल.

३. आपल्या मताच्या विरुद्ध बाजू खरी आहे, असा विचार करून आपण स्वतःला तपासू शकतो.

४. रचनात्मक मतभेद कसा सुरू होईल ? याचा आपण विचार शकतो.

५. खुले प्रश्न विचारा ज्यांचे उत्तर मनमोकळेपणे देता येतील.

६. इतरांशी तुमच्या निर्णय बद्दल चर्चा करा. तज्ञ व्यक्ती ला भेटा.

७ . छोटे छोटे प्रयोग करून पहा, आपल्या विचारांची परीक्षा घ्या.

३. निर्णय घेण्यापूर्वी काही काळ जाऊ द्या.

जेव्हा आपण इतरांना सल्ला देतो तेव्हा आपण सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष देतो. मात्र आपण स्वतःच्या बाबतीत असे करू शकत नाही कारण ? भावना. निर्णय घेण्यापूर्वी काही काळ जाऊ द्या. त्यामुळे तुम्ही भावनिक निर्णय घेणार नाहीत.

समजा बस मध्ये तुम्हाला एक मुलगी आवडली. तुम्ही तिच्याशी बोलण्याचा विचार करत आहात, पण तुमची हिम्मत होत नाही. तुम्ही १०/१०/१० या सूत्राचा वापर करू शकता.

मी या मुलीला बोललो तर दहा मिनिटांनी काय होईल ?

१. कदाचित ती हो बोलेल, मी खुश होईल.

२. ती नाही बोलेल, माझा अपमान होईल.

जर तिने नकार दिला तर १० महिने नंतर तुमच्या आयुष्यात एखादी दुसरी मुलगी असेल किंवा नसेलही. आणि बहुतेक तुम्ही ही घटना विसरला देखील असाल.

१० वर्षानंतर याची शक्यता जास्त आहे की तुम्ही तुमच्या बायको बरोबर असाल आणि तेव्हा या गोष्टीचे तुम्हाला वाईट वाटेल याची शक्यता फार कमी आहे.

तुमच्या मित्राला या परिस्थिती मध्ये तुम्ही काय सल्ला द्याल ?

इतरांना सल्ला देण्याचे दोन फायदे असतात.

१. आपण जी गोष्ट महत्वाची आहे त्यावर भर देतो.

२. आपण अल्पकालीन भावनांकडे दुर्लक्ष्य करतो.

त्यामुळे माझ्या मित्राला या परिस्थितीमध्ये मी काय सल्ला देईल हा विचार करा.

४. चूक होण्यास तयार रहा.

लिफ्ट च्या वायर क्षमतेपेक्षा ११ पट जास्त मजबूत असतात. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यांचा विचार केला जाऊ शकत नाही. आपण अशा गोष्टींसाठी तयार असले पाहिजे. म्हणून तुम्ही घेतलेले निर्णय हे चुकीही शकतात, तुम्ही याचा विचार केला पाहिजे.

Friday, March 13, 2020

How the Yes Bank crisis has caused a domino effect


Masses were only reviving and starting to gain their faith in the financial system of the country when we witnessed yet another setback, this time to the banking segment of the nation. Private banking player Yes Bank, which once had a dominant position in the country saw its NPAs climbing fast with the bank’s primary lenders currently undergoing steep valuation declines or started undergoing an investigation itself.

The resultant cash crunch was responsible for the trickle-down effect that not only affected the direct account holders but had an impact on various other fronts as well.

The first and foremost effect of the Yes Bank crisis was on Life Insurance Corporation of India. The insurer has usually seen a high amount of revenue collection coming in the month of March every year. The premiums usually flow in these days as online payments. With the automation of processes, the bank for NACH debit and cheque clearances for LIC was Yes Bank which is expected to affect the collections for the corporation for the month of March for Q4 ‘20.

LIC had also earlier sent a message stating there would be a delay in premium debit for policies. This would add to the distress that the crisis has already been causing.

Another impact is on the account holders as the bank is under a moratorium restricting the monthly withdrawal to Rs 50,000, subject to certain exceptions and prior approvals from RBI. This is not only bound to hinder the day to day activities for people whose, primary bank accounts were in yes Bank, but may also hamper small businesses.

Not only would this affect the daily lifestyle, but it may also demotivate the people who wanted to apply for the SBI Card IPO. Out of all the applications for allotments received for the IPO, applications worth Rs 1,500 crore were through people with their accounts in Yes Bank.

Even though the company said that if the applicants are able to pay the amount through an alternative bank account the allotment would still be done, this may not be a practically feasible option for many in such a short notice. Thus, the crisis is expected to have its effects on the IPO too, affecting the listing price and number of participants to a huge extent.

On the other side however, one should also keep in mind that a good participation even if after the effects of the crisis, may help Yes Bank in the long run. This can be said based on the fact that SBI would be infusing capital in the beleaguered bank soon, taking a 49 percent stake as a part of restructuring scheme that has been proposed. The collections of the IPO would thus help SBI fund this move too. However, whether each process would be executed successfully is based upon the IPO’s performance in the current bearish markets.